Home Uncategorized गॅस गळतीमुळे आग लागून पती-पत्नीसह ४ मुलांचा होरपळून मृत्यू

गॅस गळतीमुळे आग लागून पती-पत्नीसह ४ मुलांचा होरपळून मृत्यू

2 second read
0
0
197

no images were found

गॅस गळतीमुळे आग लागून पती-पत्नीसह ४ मुलांचा होरपळून मृत्यू

पानिपत : हरियाणातील पानिपत येथून ही मोठी दुर्घटना समोर आली आहे. सकाळी चहा बनवत असताना एका कुटुंबासोबत दुर्घटना घडली. चहा बनवतानाच मोठा अनर्थ घडला; गॅस गळतीमुळे आग लागून पती-पत्नीसह ४ मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच, तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अधिकारी छतावरून दरवाजा तोडून आत शिरले. तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. तसेच कोणालाही घरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिचपडी गावातील गल्ली क्रमांक चारमध्ये ही घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. गॅस सिलिंडरला आग लागली तेव्हा ते स्वयंपाक करण्याच्या तयारीत होते. आग इतकी वेगाने पसरली की त्यांना आतून बाहेर पडण्याची किंवा आवाज करण्याची संधीही मिळाली नाही.
गुरुवारी तहसील कॅम्प येथील राधा कारखान्याजवळ एका घरातील गॅस सिलिंडर गळतीमुळे संपूर्ण घराला आग लागली. त्यावेळी घरात पती-पत्नी आणि चार मुले उपस्थित होती. या अपघातात संपूर्ण कुटुंब जळून खाक झाले. शेजारी पोहोचेपर्यंत सर्व काही खाक झाले होते. मृतांमध्ये पती-पत्नी आणि ४ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अब्दुल (४२ वर्षे), अफरोज (४० वर्षे), त्यांच्या दोन मुली रेश्मा (२०) आणि इशरत (१७ वर्षे), अशी मृतांची नावे आहेत. या दाम्पत्याची दोन मुले अब्दुल (१२) आणि अकफान (१०) यांचाही सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झाला. अब्दुलचे कुटुंब बधवा राम कॉलनी, केसी चौक गली क्रमांक ४ येथे भाड्याच्या घरात राहत होते. तो पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूरचा रहिवासी होता. प्राथमिक तपासानंतर एसपी शशांक कुमार सावन म्हणाले की, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …