Home क्राईम फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सरकारची कारवाई

फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सरकारची कारवाई

0 second read
0
0
175

no images were found

फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सरकारची कारवाई

नवी दिल्ली : युट्यूब चॅनेलवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कारवाई केली आहे. हे चॅनेल्स फेकन्यूज अर्थव्यवस्थेचा भाग आहेत असा दावा सरकारनं केला आहे. दिशाभूल करण्यासाठी अशी चॅनेल्स खोटी माहिती, क्लिकबिट, सनसनाटी फोटोज आणि टेलिव्हिजन न्यूज अँकरचे फोटोज वापरत असल्याचा दावा पीआयबीनं केलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्टचेक युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहा युट्यूब चॅनेल्स बंद करण्यात आले आहेत. हे चॅनेल्स खऱ्या बातम्या आणि खोट्या बातम्या समन्वय पद्धतीनं चालवत होते. या चॅनेल्सनं कुठल्या फेकन्यूज चालवल्या आहेत याचे सहा ट्विटर थ्रेड पीआयबीनं शेअर केले आहेत. यामध्ये १०० हून अधिक फॅक्टचेक करण्यात आलं आहे. अशा पद्धतीची ही दुसरी कारवाई पीआयबीच्या या युनिटनं केली आहे. या सर्व युट्यूब चॅनेलचे मिळून सुमारे २० लाख सबस्क्रायबर्स आहेत. तसेच त्यांचे व्हिडिओ ५१ कोटी वेळा पाहिले गेले आहेत.
निवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्सवर बंदी आणण्याबाबतच्या व्हिडिओमध्ये खोटी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ घटनात्मक संघटना, राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांच्यासारख्या व्यक्तींचा दाखला देण्यात आला आहे. हे चॅनेल्स फेकन्यूज अर्थव्यवस्थेचा भाग असल्याचाही दावा पीआयबीनं केला आहे. कारण या फेकन्यूज पसरवणारे व्हिडिओ मॉनिटाईज करण्यात आले आहेत. यामध्ये खोट्या, क्लिकबेट (युजरनं क्लिक करावेत असे हेडिंग), सनसनाटी फोटो तसेच न्यूज चॅनेल्सच्या अँकरचे फोटो वापरण्यात आले आहेत. ज्यामुळं प्रेक्षकांना विश्वास बसावा की ही बातमी खरी असून याद्वारे आपल्या चॅनेलवर युजर्स ट्राफिक आणण्याचा आणि याद्वारे हे व्हिडिओ मॉनिटाईज करण्याचा त्यांचा हेतू असल्याचंही पीआयबीनं म्हटलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…