no images were found
दुर्मिळ व गुणकारी कंदमुळ प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर : ”कंदमुळांचा उत्सव” ह्या उपक्रमाचे कौतुक करत निसर्गात उपलब्ध असणाऱ्या कंदमुळांची ओळख आणि माहिती सगळ्यांना होण्यासाठी अशी प्रदर्शन भरवणे आवश्यक असल्याचे सांगितले. पारंपरिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी कंदमुळे आपल्या शेतीत लावावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . शिवाजी विद्यापीठातील तज्ञ मंडळी आणि आयोजक ह्यांनी एकत्र येऊन कंदमुळांच्या संशोधनावर भर देऊन त्याची प्रायोगिक तत्वावर शेती , त्याचे पेटंट ह्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करून भविष्यात त्याबाबतीत असे प्रकल्प करूया असे आश्वासनही दिले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . डी .टी . शिर्के ह्यांनी उदघाटन प्रसंगी केलेल्या भाषणात सांगितले.
कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने दिनांक १२ आणि १३ जानेवारी रोजी ६० कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे १२ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत १३ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे.ह्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे,कृषी अधिकारी उमेश पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.डी.आर.मोरे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ.गीता पिल्लई, कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कंपॅशन २४ चे अध्यक्ष मिलिंद धोंड ,ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ् डॉ .मधुकर बाचूळकर, शहाजी कॉलेजचे प्राचार्य आर.के. शानेदिवाण, मोहन माने ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कंदमुळांच्या उत्सवाचे सूत्रसंचालन मिलिंद धोंड ह्यांनी करत ह्या उपक्रमाचा उद्देश विषद केला. श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब कोल्हापूर, वुई केअर हेल्पलाईन ,युथ एनेक्स ह्यांच्या सहकार्याने आजपासून शहाजी कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे ह्या कंदमुळांच्या उत्सवास प्रारंभ झाला आहे. ह्या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली ६० पेक्षा अधिक कंदमुळे शेतामध्ये लागवड करून गोळा केली आहेत.आळे कोन,पिल्ला कोन ,कोन फळ, मुन्द चिरके ,कणगा , काटेकणग ,कोराडू , उंडे , शेंडवाळे ,आडकोळी ,तांबडे कणवाल , तांबडें सावर , सुकाळी कोन, करांदा, शतावरी, अनंत मूळ, अडकोळी, रामकंद, सबुकंद, कासार अळू, नागरकोन,सुरण, गाजर,कांदा, आले,लसूण, आंबे हळद, बीट, मुळा, कुरपनी अळू ह्या सारख्या अनेक दुर्मिळ व गुणकारी कंदमुळांचा ह्यात समावेश आहे. ६० प्रकारच्या कंदांपैकी १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध असून सुमारे ६ ते ७ प्रकारच्या कंदाच्या पाककृतीबाबतची माहिती उपस्थितांना येथे दिली जाणार असून हौशी खवय्यांना कंदापासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. हे प्रदर्शन दोन दिवस सुरु राहणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत खुले राहणार आहे.यावेळी मंजिरी कापडेकर , कल्पना सावंत, अमृता वासुदेवन, जयेश ओसवाल, सुशांत टकळक्की यांच्यासह निसर्गप्रेमी आदी उपस्थित होते.