Home राजकीय माझी पुस्तके मराठीत आणण्यात वेगळाच आनंद मिळतो : डॉ. किरण बेदी

माझी पुस्तके मराठीत आणण्यात वेगळाच आनंद मिळतो : डॉ. किरण बेदी

0 second read
0
0
37

no images were found

माझी पुस्तके मराठीत आणण्यात वेगळाच आनंद मिळतो : डॉ. किरण बेदी

पुणे : मराठी माणूस खूप वाचतो म्हणून मला माझी पुस्तके मराठीत आणण्यात वेगळाच आनंद मिळतो असे उदगार डॉ.किरण बेदी यांनी काढले ‘मेहता पब्लिशिंग हाऊस ‘ तर्फे प्रकाशित डॉ. किरण बेदी लिखित व सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलेल्या “निर्भय प्रशासन” व “नेतृत्व निर्मिती” या दोन नव्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉ किरण बेदी वाचकांच्या भेटीला आल्या होत्या . हा प्रकाशन सोहळा १० जानेवारी रोजी पत्रकार भवन पुणे येथे झाला.
या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ किरण बेदी यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी वाचन प्रेमींना मिळाली . यावेळी डॉ किरण बेदी बोलत होत्या. डॉ बेदींनी याप्रसंगी त्यांच्या कारकीर्दीतील अनेक प्रसंग सांगितले. आपल्याला मिळालेली जबाबदारी आपण तनमन धनाने निभावायला हवी पुदुच्चेरीचा विकास घडवण्यासाठी मला जे जे करावे लागलं ते सर्व मी केलं फक्त सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आम्ही विकासाचा मार्ग निर्माण केला असे त्यांनी सांगितले.
डॉक्टर बेदींच्या पुस्तकांचा अनुवाद करणं हे अतिशय आव्हानात्मक असतं त्यांचं व्यक्तिमत्व अनुवादात उतरवताना भाषेपासून संदर्भांपर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते असे अनुवादक सुप्रिया वकील यांनी सांगितले. याप्रसंगी श्री सुनील मेहता यांच्या स्मरणार्थ मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे स न 2024 पासून दिल्या जाणाऱ्या प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्काराची घोषणाही करण्यात आली. या कार्यक्रमाला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी व मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक अखिल मेहता उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…