no images were found
एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली, तर युती करण्याचा आम्ही विचार करू – प्रकाश आंबेडकर
नवी मुंबई : “एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली, तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू.” असे उदगार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काढले प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. जवळपास अडीच तास ही बैठक चालली होती.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा खिमा केला. उद्धव ठाकरेंना फायनल करायचं असेल तर ते त्यांच्या हातात आहे. सेनेबरोबर समझता करण्यास आम्ही तयार, फायनल कधी करायचे हे उद्धव यांनी ठरवावं. आम्ही एकमेकांना युतीची बांधिलकी दिली आहे. पण ती सार्वजनिक झालेली नाहीये.”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकराना युती करण्याची जाहीररित्या साद घातली. त्याला काही दिवसात प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रस्ताव मान्य असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी जाहीर केलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे युतीत लढणार हे स्पष्ट झालं.