Home राजकीय शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाची अधिकाऱ्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी; महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाची अधिकाऱ्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी; महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

0 second read
0
0
32

no images were found

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाची अधिकाऱ्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी; महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर गुडघाभर खडड्यात असतानाच मंजूर काम सोडून सोयीच्या ठिकाणी डांबरीकरण का केले नाही? अशी विचारणा करून शिंदे गटातील माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी शिवागीळ जीवे मारण्याची धमकी बुधवारी सायंकाळी दिली होती. या घटनेनंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचा कडेलोट झाला असून त्यांनी आज काम बंद आंदोलन केले. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांना काल अश्लील शिवीगाळ केली होती.
बुधवारी झालेल्या वादावादीनंतर आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी रोड रोलरखाली टाकून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अत्यंत भयभित झालेल्या कनिष्ठ अभियंत्याने ठिकाणाहून काढता पाय घेतला. या घटनेनंतर अधिकारी, कर्मचारी चांगलेच संतापले होते. शहरामध्ये रस्ता डांबरीकरणाचे काम मंजूर असलेल्या ठिकाणी बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही इतर ठिकाणी उर्वरित डांबरीकरण करावे लागणार असल्याचे माजी नगरसेवकाने सांगितले. परंतु, वरिष्ठांच्या आदेशाने मंजूर ठिकाणीच काम करू असे संबंधित कनिष्ठ अभियंत्याने भूमिका घेतल्याने वादाला सुरुवात झाली.
यावेळी माजी नगरसेवकाने थेट दमदाटी आणि अरेरावीची भाषा सुरु केली. मला न विचारता डांबरीकरणाचे काम का केले? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संबंधित अभियंत्याने झाला प्रकार वरिष्ठांचा कानावर घातला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर शहरातीर रस्त्यांची अवस्था महाभयानक झाली आहे. सर्वच स्तरातून सडकून टीका झाल्यानंतर महापालिकेकडून पहिल्यांदा पॅचवर्क करण्यात आले. यानंतर आता अत्यंत भयानक झालेल्या मार्गांवर डांबरीकरण सुरु केलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…