no images were found
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पॅकेज घोषित करा- हेमंत पाटील
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी उत्तम रित्या काम करीत आहे .पंरतु, आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे महागाई वाढली आहे. या वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटील आला आहे. या संकटातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी आणि बाजारात भांडवल खेळते ठेवण्यासाठी केंद्र सरकारने किमान १० ते २० लाख कोटींचे पॅकेज महागाई नियंत्रणात आणण्यासाठी घोषित करावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोट्यवधींचा विकास निधी खर्च केला जातो. याच निधीतून अनेक प्रकल्प उभारून रोजगाराच्या संधी वाढवण्याकडे मोदी सरकारचा कल आहे. सरकार यासोबतच या एकूण निधीपैकी किमान १०% निधी महागाई, दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी पॅकेज स्वरुपात घोषित करावी, अशी इंडिया अगेन्स्ट करप्शनची भूमिका असल्याचे पाटील म्हणाले.