
no images were found
आज तीन गोल्ड जिंकून पदकतालिकेत आणखी वर जाण्याची भारताला संधी
मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज शेवटचा दिवस असून 28 जुलैपासून सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत विशेष कामगिरी बजावली आहे. वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगच्या खेळातून भारताने पदकांची लूट केली. पदकतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानी आहे. भारताच्या पुढे न्यूझीलंड आहे. दोघांच्या सुवर्णपदकांमध्ये फक्त एका मेडलच अंतर आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, त्यावर पदकतालिकेत भारताचं स्थान निश्चित होईल. भारत टॉप 5 मध्ये आहे. परंतु त्यात अजून एकास्थानाची सुधारणा करण्याची संधी आहे. बॅडमिंटन मध्ये भारताला आज तीन गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे. महिला एकेरीत पी.व्ही.सिंधू, पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांची गोल्डवर नजर असेल. सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल ली विरुद्ध होणार आहे.