Home शैक्षणिक टीईटी घोटाळा प्रकरण : अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द?

टीईटी घोटाळा प्रकरण : अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द?

0 second read
0
0
78

no images were found

टीईटी घोटाळा प्रकरण : अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द?

औरंगाबाद :  शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा प्रकरणात एक मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. आधीच शिक्षक पात्रता परीक्षेत अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती आली आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काहीजणांना अटक देखील करण्यात आली असून ईडीकडून देखील या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचप्रमाणे जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे.

Load More Related Articles

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …