
no images were found
ज्येष्ठ नागरिकांच्या २१ संघटना एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार ; ऑगस्ट क्रांतीदिनी आंदोलन
नागपूर : नागपूरातील २१ ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनाच्या मुहूर्तावर ९ ऑगष्टला सकाळी ११ ते १२ दरम्यान संविधान चौकात मुक आंदोलन करण्यात येणार आहे. सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे व संयोजक सुरेश रेवतकर यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेतर्फे कळवण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरूवात होईल. ईपीएस-९५ पेंशनमध्ये वाढ करावी, रेल्वे सवलत मिळावी, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांसाठी निधी द्यावा, बस प्रवास करिता स्मार्ट कार्ड बंद करावे व आधार कार्डवर बस सवलत द्यावी, वृद्ध कलाकारांचे दोन वर्षाचे थकीत मानधन तातडीने मंजूर करावे, गरीब व गरजू ज्येष्ठांना वैद्यकिय सोयी द्याव्या. शासकीय कार्यालयात ज्येष्ठांना भेटीची वेळ निश्चित करावी आदी मागण्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत.