
no images were found
महाराष्ट्रालाही खबरदारीच्या सुचना -केंद्रीय आरोग्य सचिव
भारतात गेल्या २४ तासात १९ हजार ४०६ नव्या रुग्णांसह ४९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्राने सात राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. या राज्यांमध्ये आठवड्याचा कोरोना संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्यासोबतच कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सुचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. येत्या काळात अनेक सण, उत्सव भारतात साजरे केले जातील. यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गासह त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.