
no images were found
एकाच छताखाली रूग्णांची सोय- खासदार मंडलिक
कोल्हापुरातील ईएसआयसी हॉस्पिटलच्या आधुनिकीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण होणार आहे. त्यामुळे लाखो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘एम्स’च्या धर्तीवर ‘एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा’ मिळणार आहेत, अशी माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. ईएसआयसी हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणाचे काम केंद्रीय लोक निर्माण विभागाने मार्च 2021 मध्ये निविदा प्रक्रिया राबवून दिल्लीतील ठेकेदारास डिसेंबर 2022 अखेर पूर्ण करण्याच्या अटीवर दिले होते. वेळोवेळी सूचना देऊनही या ठेकेदाराकडून काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने त्यांचा ठेका केंद्रीय लोक निर्माण विभागाने रद्द केला.
हॉस्पिटलच्या कामाबाबत बुधवारी दिल्ली येथे ईएसआयसीच्या राष्ट्रीय मुख्यालयात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात नवीन ठेकेदारांकडून मार्च २०२३ पर्यंत युद्धपातळीवर काम पूर्ण करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. राज्यात ईएसआयसीच्या पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे वाढविण्यासाठी रोडमॅप तयार करण्याचे ठरविण्यात आले.