no images were found
शिवाजी विद्यापीठात स्टार्टअपना मिळणार चालना
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरच्या ‘एसयुके रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ या सेक्शन 8 कंपनीमार्फत ‘मंथली इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली असून, त्याद्वारे विद्यार्थी, संशोधक व नागरीकांना उद्भवणा-या विविध समस्यांवर नाविण्यपूर्ण उत्तरे सुचविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एक विषय देवून त्यावर विद्यार्थी, शिक्षक व नागरीकांनी त्या संदर्भातील त्यांनी शोधलेले प्रश्न त्यावर शोधलेले कल्पक पर्याय अथवा उत्तर विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या वेबसाईट वरील News and Event – Monthly Innovation Challenge या लिंकवरील गुगल फॉर्म मध्ये भरावयाचे आहे. या प्रक्रियेतून नाविन्यपूर्ण संकल्पनातून स्टार्टअप स्थापन करणे व त्याद्वारे तंत्रज्ञानाचे समाज हिताकरीता प्रभावी हस्तांतरण करणे सोपे होणार आहे. या महिन्याचे चॅलेंज हे IoT (Internet of Things) या संकल्पनेवर असून त्याद्वारे सामान्य माणसाच्या समस्यांवर नवसंकल्पना सादर करणेचे आवाहन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. एम्. एस्. देशमुख यांनी केले आहे.