Home सामाजिक परभणीत मातंग समाजाची राजकीय भागीदारी परिषद संपन्न

परभणीत मातंग समाजाची राजकीय भागीदारी परिषद संपन्न

0 second read
0
0
335

no images were found

परभणीत मातंग समाजाची राजकीय भागीदारी परिषद संपन्न

  मुंबई / परभणी : पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेपासून कायमच दूर असलेल्या मातंग समाजाने आंबेडकरी आंदोलनात सामील झाले पाहिजे. या क्रांतीकारी आंदोलनात केवळ बहुजन समाज पार्टीच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे येत्या काळात मातंग समाज हा सत्तेचा केंद्रबिंदू झाला पाहिजे, या ध्येयाने झपाटून कार्यसिद्धीला प्राप्त करू, असा विश्वास बसपाचे राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ.अशोक सिद्धार्थ यांनी व्यक्त केला.      साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज, रविवारी मराठवाडा विभागीय बुद्धीजीवी मातंग समाजाची राजकीय भागीदारी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेते उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.सिद्धार्थ यांनी मातंग समाजाबद्दल बसपाची भूमिका स्पष्ट केली. शहरातील श्री.रघुनाथ सभागृहात आयोजित या परिषदेते डॉ.सिद्धार्थ यांच्यासह प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेब, प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…