no images were found
हुतात्मा स्मारक प्रतिभानगर येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत स्वराज्य महोत्सव
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि.9 ते 17 ऑगस्ट हा आठवडा प्रतिभानगर हुतात्मा स्मारक येथे स्वराज्य महोत्सव (एक कदम – राष्ट्रप्रेम की और अभियान) म्हणून साजरा केला जात आहे. यामध्ये जेष्ठ नागरीक, महिला, युवक, युवती, शालेय विद्यार्थी यांना मोठया प्रमाणात सहभागी करुन घेतले जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची महती वर्णन करणारी भिती पत्रके, छायाचित्रे यांची प्रदर्शन आठवडाभर आयोजित केले असून आठवडाभर पर्यावरण, स्वातंत्र, महिला व जेष्ठ नागरीकांचे कायदे यावरील प्रबोधनात्मक व्याख्याने दररोज सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेली आहेत. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढयाच्या स्मृतीत तैवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतावलेले स्पुलिंग कायम तैवत राहावे. देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जन माणसात रुजावी या दैदित्यमान इतिहासाचे अभिमानपुर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.