no images were found
इमारतींना मालमत्ता कराच्या आकारणीसाठी 33 अर्ज दाखल
कोल्हापूर : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्याबाबत शुक्रवारी छ.ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत 33 अर्ज दाखल झाले. शहरातील ज्या मिळकतींवर (इमारतींवर) खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतींवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी घरफाळा विभागाच्यावतीने चार दिवस विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शुक्रवारी छ.ताराराणी मार्केट, विभागीय कार्यालयाअंतर्गत नवीन कर आकारणी करण्याकरीता 33 मिळकतधारकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. या प्राप्त 33 अर्जावर कागदपत्र मागणी बाबत जागेवर नोटीस देवून पुढील दोन दिवसांत त्यांची जागेवर मोजमापे घेऊन कर आकारणी अंतीम करण्याचे नियोजन करण्यात आले. या कॅम्पला उप आयुक्त- शिल्पा दरेकर व कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. तर कर अधिक्षक विजय वणकुंद्रे यांनी दिवसभर कार्यालयात उपस्थित नागरीकांचे तक्रारीचे निवारण केले. या कॅम्पला नागरीकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला असून चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत गेल्या चार दिवसाच्या 70 मिळकतधारकांनी आपले अर्ज कर आकारणीसाठी सादर केले आहेत.