no images were found
अखिल भारतीय (साऊथ वेस्ट) मैदानी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ रवाना
कोल्हापूर : तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्टस युनिव्हर्सिटीमध्ये दि.९ते१२ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ (साऊथ वेस्ट) मैदानी स्पर्धेसाठी आज शिवाजी विद्यापीठाचा ४५ खेळाडूंचा संघ रवाना झाला.
२४व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केलेले खेळाडू या संघात आहेत. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शरद बनसोडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी प्रावीण्य मिळवुन अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र व्हावेअशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रशांत पाटील, डॉ.राहुल मगदुम, निवड समिती सदस्य प्रा.सुरेश धुरे, प्रशिक्षक प्रा. आर.टी. पाटिल, संघ व्यवस्थापक डॉ. इब्राहिम मुल्ला, डॉ. रूपाली कांबळे उपस्थित होते.