Home राजकीय नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला, त्यांची नार्को टेस्ट करा: विनायक राऊत

नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला, त्यांची नार्को टेस्ट करा: विनायक राऊत

0 second read
0
0
166

no images were found

नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला, त्यांची नार्को टेस्ट करा: विनायक राऊत

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत:च्या सख्ख्या चुलत भावाचे घरासमोर डोके फोडून त्याचा खून केला. त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याला जाळून टाकले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. नारायण राणे हे हैवानाची औलाद आहेत. त्यांची नार्को टेस्ट केली तर अनेक खुनांना वाचा फुटेल, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली. कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला.
खासदार विनायक राऊत म्हणाले, येथील आमदाराची उंची किती, डोकं केवढं त्याच्यात अक्कल केवढी, मेंदू केवढा, तरीही ते आकांडतांडव करतात. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे एकच टार्गेट. हे करताना नितेश राणेंनी वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी. सख्या चुलत भावाचे घरासमोर डोकं फोडून, त्याला गाडीत घालून नांदगावला नेऊन जाळून टाकले, असा राणेंचा इतिहास. नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीत जेवढे खून झाले. जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. नाहीतर नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्यात यावी. जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडविला हे सर्वांना कळेल.
२०१४ नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एकही राजकीय बळी गेला नाही. आम्हाला जिल्ह्यात शांतात हवी आहे.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे.असे खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले. हिंमत असेल तर त्यांनी आपल्या ग्रामदेवतेची शपथ घेऊन सांगा, कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या त्या पनवेलच्या रुग्णालयामध्ये लोकांना फसवले नाही. आलेल्या प्रत्येक रुग्णाला तुम्ही लुबाडलं नाही म्हणून सांगा

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…