
no images were found
पुण्यातील वकिलाचा नांदेडमध्ये आढळला अर्धवट जळलेल्या मृतदेह
पुणे: येथील काळेवाडी परिसरातून गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत नांदेड या ठिकाणी आढळला आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवशंकर शिंदे असे मृत वकिलाचे नाव असून वाकड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
३१ डिसेंबरच्या दुपारपासून अॅड. शिवशंकर शिंदे यांच्या कार्यालयातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर कुटुंबियांकडून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांकडून वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत शिंदे यांचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळल्याने कुटुंबीयांसह सर्वानाच हादरा बसला आहे. शिंदे यांची कोणाशी झटापट झाली असल्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच त्यांचा त्यांच्या कार्यालयातच काही घातपात झाला का? याबाबत तपास करत असून त्यांच्या कार्यालयात शर्टाचं बटण आणि रक्त आढळलं आहे. वाकड पोलिसांकडून तपासाची सुत्रं हलविण्यात आली असून तपास वेगात सुरू आहे.