
no images were found
बडे अच्छे लगते हैं – 2 मध्ये लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार हितेन तेजवानी
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बडे अच्छे लगते हैं – 2 ही मालिका सुरू झाल्यापासूनच लोकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील आकर्षक कथानकाने यशस्वीरित्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि राम आणि प्रिया या टेलिव्हिजनवरच्या नवीन रोमॅंटिक जोडीने जन्म घेतला, ज्यांना लोक प्रेमाने #RaYaम्हणतात. वर्तमान कथानकाच्या गरजेनुसार सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता हितेन तेजवानी याला आता मालिकेत घेतले आहे, जो रामचा भाऊ लक्ष्मणची भूमिका करणार आहे.राम आणि लक्ष्मण हे दोघेही एकमेकांच्या अस्तित्वाबाबत अनभिज्ञ आहेत. राम आणि लक्ष्मण जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल हे पाहणे रोचक असेल.
या लोकप्रिय मालिकेत दाखल होत असल्याचा आनंद व्यक्त करताना हितेन तेजवानी म्हणतो, “लखन हा रामचा धाकटा भाऊ आहे. त्याच्या आगमनामुळे कथानक कोणते वळण घेईल हे काळच सांगेल. पण, मी इतके नक्की सांगू शकतो की, ही भूमिका खूप रोचक आहे आणि कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाची देखील आहे. त्याला मोठी पार्श्वभूमी आहे. कथानकाच्या ओघात त्याची मालिकेत एंट्री होईल. टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिरेखा असलेल्या रामच्या भावाची भूमिका मिळाल्याचा मला नक्कीच आनंद आहे, पण त्याच बरोबर या मालिकेच्या निष्ठावान प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचे आव्हान देखील माझ्यापुढे आहे. पुन्हा एकदा माझी लाडकी मैत्रीण एकता हिच्यासोबत काम करताना मला आनंद होत आहे. बडे अच्छे लगते हैं 2 सारख्या मोठ्या मालिकेत मला भूमिका दिल्याबद्दल मी तिचा ऋणी आहे. येथे मला बरेच काही करण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे.ही एक आयकॉनिक मालिका आहे आणि लक्षावधी प्रेक्षकांचे मन या मालिकेने जिंकले आहे. एका अभिनेत्याला यापेक्षा आणखीन ते काय हवे?”