
no images were found
कात्रज घाटात महिला रिक्षा चालकावर प्रवाशाकडून बलात्काराचा प्रयत्न; नग्न अवस्थेतही केला पाठलाग
पुणे : येथील एका महिला रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न झाला. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीनं रिक्षा चालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना येथील कात्रज घाटात दि 26 रोजी रात्री दहा वाजता घडली. रिक्षा चालक महिलेनं आरोपीला विरोध केला असता, त्यानं संपूर्ण कपडे काढून, नग्न अवस्थेत या महिलेचा कात्रज घाटात पाठलाग केला. या प्रकरणी ३८ वर्षीय महिला रिक्षा चालकानं तक्रार दिली आहे. याप्रकणी निखिल अशोक मेमजादे (30) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी महिला या रिक्षा चालक आहेत. 26 रोजी आरोपी रात्रीच्या सुमारास कात्रज घाटात जायचं आहे, असं सांगून रिक्षात बसला. दरम्यान, कात्रज घाटातील एका लॉजिंगजवळ रिक्षा थांबून त्यानं महिला चालकाला जेवणासाठी जबरदस्ती केली. मात्र, या महिलेनं नकार दिल्यानंतर त्यानं तिला मारहाण करत तिच्याकडं शारीरिक संबंधाची मागणी केली. यावरच आरोपी थांबला नाही तर त्यानं त्याचे सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत रिक्षात बसला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महिला कात्रज घाटात पळून जात असताना आरोपीनं नग्न अवस्थेत तिचा पाठलाग केला. या महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रात्री दहा वाजता हा सगळा प्रकार घडला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे . याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.