Home क्राईम एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करण्यासाठी मिक्सरमध्ये लावलेल्या स्फोटकाने एक गंभीर जखमी

एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करण्यासाठी मिक्सरमध्ये लावलेल्या स्फोटकाने एक गंभीर जखमी

0 second read
0
0
37

no images were found

एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करण्यासाठी मिक्सरमध्ये लावलेल्या स्फोटकाने एक गंभीर जखमी

बंगळुरू: येथे २८ वर्षांच्या तरुणानं एका ३२ वर्षीय महिलेची हत्या करण्यासाठी मिक्सरमध्ये स्फोटक लावलं होतं. मात्र महिलेनं कुरियर स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यानं पार्सल पुन्हा कार्यालयात नेलं. तिथे मिक्सरचा स्फोट झाला. त्यात कुरियर कंपनीचा मालक जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिक्सरमध्ये झालेला स्फोट दहशतवादाशी संबंधित घटना असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र तपासातून वेगळीच माहिती समोर आली. महिलेचा बदला घेण्यासाठी तरुणानं मिक्सरमध्ये स्फोटक लावल्याची माहिती तपासामधून उघड झाली. ‘हसान परिसरात वास्तव्यास असलेला एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेवर लक्ष ठेऊन होता. त्यानं याआधीही कुरियरच्या माध्यमातून महिलेच्या घरी भेटवस्तू पाठवल्या. मात्र महिलेनं त्या स्वीकारल्या नाहीत. असं हसानचे पोलीस अधीक्षक हरीराम शंकर यांनी सांगितलं. महिला भेटवस्तू स्वीकारत नसल्यानं, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं तरुण संतापला. त्यानं महिलेचा खून करण्याची योजना आखली. एका मिक्सर ग्राईंडरमध्ये स्फोटक बसवून त्यानं मिक्सर पार्सल केलं. मात्र महिलेलं पार्सल घेण्यास नकार दिला.
कुरियर कार्यालयाचे मालक शशीकुमार यांनी पार्सल पुन्हा नेण्यासाठी महिलेकडे ३५० रुपयांची मागणी केली. मात्र महिलेनं पैसे देण्यास नकार दिला. यानंतर पार्सल कुरियर कार्यालयात परत नेलं. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास शशीकुमार यांनी पार्सल उघडलं. त्यात त्यांना मिक्सर दिसला. तो व्यवस्थित आहे का ते पाहण्याचा प्रयत्न शशीकुमार यांनी केला. त्यावेळी मिक्सरचा स्फोट झाला. त्यात शशीकुमार जखमी झाले. ‘आरोपीनं महिलेची हत्या करण्यासाठी कट रचला होता. अशी माहिती शंकर यांनी दिली. या प्रकरणी महिलेकडे चौकशी सुरू आहे. तिनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शशीकुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…