no images were found
समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित प्रवर्गातील मुला-मुलींसाठी मोफत प्रवेश सुरु
कोल्हापूर : समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यामध्ये मुला-मुलींची २८ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२३-२४ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी अर्ज प्रत्येक सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय व शासकीय वसतिगृहामधून विनामुल्य विद्यार्थ्यांना / पालकांना वितरीत करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी दि. १२ ते 31 जुलै २०२३ पर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोढे यांनी केले आहे.
मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनु. जाती, अनु. जामाती विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गामधील शालेय विद्यार्थी व इयत्ता १० वी व १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम गळून) तसेच बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम. ए. एम. कॉम./एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायीक) अभ्यासक्रम बगळून) तसेच प्रवेश अर्जाची PDF आवश्यक त्या सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, २ वेळेचे जेवण राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत.
सन २०२३-२४ या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) असून गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित वसतिगृहाचे अधीक्षक यांच्याकडे अर्ज भरुन सादर करावेत. पहिली प्रवेश निवड यादी अनुक्रमे दि.१४ जुलै 2023 व दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी अंतिम करण्यात येईल तसेच व्यवसायीक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोढे यांनी केले आहे.