no images were found
माझी भूमिका थेट असणार आहे :- भाजप नेत्या पंकजा मुंडे
बीड :- माझ्या पक्षाला सन्मान वाटत असेल माझी अपेक्षा आहे, जनतेला लपून-छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं.
मला एक-दोन महिन्यांच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर सांगितलं होतं, ज्या विचारधारेला समोर ठेवून मी राजकारणात आले त्यांच्याशी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातील एक्झीट घ्यायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मी कोणत्याही नेत्याशी पक्ष प्रवेशाबद्दल भेटले नाही. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्रत्यक्ष कधी पाहिले ही नाही. मी नाराज नाही, पण दुःखी आहे असेही जाहीर केले.
सध्या राज्यात कोणची सत्ता, कोणाला मंत्रिपद, हे आमला हवंय ते आम्हाला हवंय असं सुरू आहे. यात लोकांचं काय? तरुणांचं, महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचं काय? सुपरस्टारचा मुलगा असल्याने त्याच्याकडे ड्रग्ज सापडल्याची चर्चा होते. पण एवढ्या सोप्या पद्धतीने देशात ड्रग्ज मिळतं यावर का चर्चा होत नाही? असा सवाल ही पंकजा मुंडे यांनी यावेळी विचारला.
माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्याने मी प्रचंड कंफ्यूज आहे. मी २० वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्यीची गरज आहे असेही पंकजा मुडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मी कोणत्याही नेत्याशी पक्ष प्रवेशाबद्दल भेटले नाही. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्रत्यक्ष कधी पाहिले ही नाही. मी नाराज नाही, पण दुःखी आहे असेही जाहीर केले.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, एखाद्या पदावर विराजमान माणसाकडे जर काही माहिती असेल तर ती माहिती लपवून ठेऊन त्याचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केली नाही पाहीजे. त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहीजे.