
no images were found
भाईगिरीतून पुण्यात अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार
पुणे : येथील सय्यदनगर शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला ला आहे. पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणाऱ्याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केला.
मुख्य रस्त्यावर येऊन हातात पिस्तुल घेऊन यातील एकाने ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे, तो जान से हात धो बैठोगे,” असे म्हणत पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली. अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणे झाली होती. या भांडणातून फायरिंगचा हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले तपास करीत आहेत.