Home शासकीय दोनदा मदत घेतलेल्या कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून वसुलीचा आदेश

दोनदा मदत घेतलेल्या कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून वसुलीचा आदेश

2 second read
0
0
131

no images were found

दोनदा मदत घेतलेल्या कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून वसुलीचा आदेश

कोल्हापूर : कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला; ६० जणांच्या खात्यांवर ही मदत दोनदा वर्ग झाली आहे. या रकमेची परत वसुली करणे ही जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी बनली आहे. ६० पैकी २० हून अधिक कुटुंबीयांनी वसुलीचा फोन जाण्याआधी स्वतःहून प्रामाणिकपणे रक्कम परत केली आहे. २० जणांना प्रशासनाने फोन केल्यानंतर तजवीज करून रक्कम भरली. उर्वरित लोकांनी पैसे भरू, असे सांगितले आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना शासनाच्या वतीने ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. जिल्ह्यातील ७ हजारांवर वारस पात्र ठरले आहेत. त्यांच्या अर्जांची व कागदपत्रांची छाननी करून खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे. डेटा तपासणी केल्यानंतर प्रशासनाच्या असे लक्षात आले की, ६० व्यक्तींच्या खात्यांवर दोनदा पैसे वर्ग झाले आहेत. राज्य शासनातील अधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला दुसर्‍यांदा जमा झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …