Home क्राईम मुलांना बिस्कीटासाठी १०० रुपये देऊन शिक्षकाची वर्गखोली आत्महत्या

मुलांना बिस्कीटासाठी १०० रुपये देऊन शिक्षकाची वर्गखोली आत्महत्या

0 second read
0
0
226

no images were found

मुलांना बिस्कीटासाठी १०० रुपये देऊन शिक्षकाची वर्गखोली आत्महत्या

गंगाखेड : सोमवारी सकाळी शाळा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्कीट खाण्यासाठी शिक्षकाने शंभर रुपये दिले. त्यानंतर वर्गखोली मध्ये जाऊन आत्महत्या केली. ही घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडली आहे. विठ्ठल अनंत रत्नपारखे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकाने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे हे मात्र स्पष्ट झाले नाही.
विठ्ठल रत्नपारखे ( रा. गंगाखेड ) हे शिक्षक आज सकाळी नेहमीप्रमाणे धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी शाळा उघडल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये आले. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट खाण्यासाठी शंभर रुपये दिले. त्यामुळे काही विद्यार्थी बिस्किट आणण्यासाठी दुकानावर गेले. काही विद्यार्थी शाळेच्या मैदानामध्ये खेळत होते. तर पोषण आहार शिजवणारी महिला भांडी घासत होती. यावेळी शिक्षक विठ्ठल रत्नपारखे हे वर्ग खोलीमध्ये गेले आणि त्यांनी आत मधून दार लावून घेऊन वर्गखोलीमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.
बिस्किट घेऊन आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी खिडकीमधून आत पाहिला असता शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी आत्महत्या केली असल्याचे विद्यार्थ्यांना दिसून आले. याची माहिती गावातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण, गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…