no images were found
जिल्ह्यात नशामुक्तीसाठी जनजागृतीपर मोहीम राबवावी -प्रभारी जिल्हाधिकारी
* राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 ची जिल्हास्तरीय बैठक, समितीकडून दहा दिव्यांगाच्या पालकत्वाला कायदेशीर मंजुरी
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहावा यासाठी जनजागृतीपर मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृह येथे आयोजित नशामुक्त भारत अभियान जिल्हास्तरीय नशाबंदी मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी शिक्षण उपसंचालक रवींद्र चौगुले, शिक्षणाधिकारी (मा.) एकनाथ आंबोरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, पोलीस निरीक्षक तथा प्र. पोलीस उपअधीक्षक ए. डी. फडतरे, समिती सदस्य समीर देशपांडे, सायबर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुरेश आपटे यांच्यासह अन्य समिती सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, नशा मुक्त अभियानाच्या जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांनीही पुढाकार घ्यावा. विशेषतः यामध्ये सामाजिक कार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करुन जिल्ह्यातील व्यसनांधिंतेबाबत सर्वेक्षण करावे, अशी सूचना त्यांनी केली.