no images were found
मुंबईत लोअर परेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सहा आरोपींना अटक
मुंबई : येथील मधील लोअर परेल भागातूनएका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपीपैकी तीन आरोपी अल्पवयीन असून, अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तर इतर तीन ओरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींनी ३० डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. हा धक्कादायक प्रकार २३ डिसेंबरची आहे. तीन अल्पवयीन आरोपींपैक एकजण पीडित मुलीचा मित्र असल्याचे समोर आले आहे. याच मित्राने पीडितेला एक मित्राच्या घरी नेले जेथे तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.