Home शैक्षणिक नीट -2025 मध्ये संजय घोडावत आयआयटी ॲन्ड मेडिकल ॲकॅडमीची चमकदार कामगिरी

नीट -2025 मध्ये संजय घोडावत आयआयटी ॲन्ड मेडिकल ॲकॅडमीची चमकदार कामगिरी

6 second read
0
0
117

no images were found

नीट -2025 मध्ये संजय घोडावत आयआयटी ॲन्ड मेडिकल ॲकॅडमीची चमकदार कामगिरी

       कोल्हापूर,(प्रतिनिधी ) : संजय घोडावत आयआयटी ॲन्ड मेडिकल ॲकॅडमी (एसजीआयएमए) च्या विद्यार्थ्यांनी नीट 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ज्यामुळे शैक्षणिक उत्कृष्टता आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी ॲकॅडमीची वचनबध्दता पुन्हा अधोरेखित झाली आहे. एसजीआयएमए हा संजय घोडावत युनिव्हर्सिटी (एसजीयू) चा एक भाग आहे,जो 2009 पासून सक्रीयपणे कार्यरत असलेल्या भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक असलेल्या संजय घोडावत समूहाची उच्च शिक्षण शाखा म्हणून काम करते.संजय घोडावत आयआयटी ॲन्ड मेडिकल ॲकॅडमी (एसजीआयएमए) ची विद्यार्थिनी उत्कर्षा हळींगळे हिने 720 पैकी 633 गुण मिळवून नीट 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 193 आणि कॅटेगरी रँक 45 मिळवला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एसजीआयएमए मधील एकूण 5 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत आणि 107 हून अधिक विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ॲकॅडमीच्या इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांमध्ये सृष्टी कदम हिने 615 गुणांसह, ऑल इंडिया रँक 627,आदित्य फातले (606 गुण,एआयआर 986),श्रेया पवार (605 गुण, एआयआर 1031) आणि विकास चौधरी (600 गुण,एआयआर 1369) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबाबत बोलताना संजय घोडावत आयआयटी ॲन्ड मेडिकल ॲकॅडमी (एसजीआयएमए) चे संचालक वासू कोंडुती म्हणाले की, दूरदृष्टी व दृढ निश्चय ही यशाची गुरूकिल्ली आहे. संजय घोडावत आयआयटी ॲन्ड मेडिकल ॲकॅडमीमधील आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली कामगिरी ही शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि संस्थेमध्ये आम्ही जोपासत असलेल्या सहाय्यक वातावरणाचा पुरावा असून हा अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा क्षण आहे. आमच्या समर्पित प्राध्यापकांचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या गुणवान विद्यार्थ्यांचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल व नीट 2025 मध्ये उत्कृष्ट निकालसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. निकालांमध्ये असलेली संस्थेची उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…