
no images were found
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात
पुणे : भाजपचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटणजवळ अपघात झाला. गोऱे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहे. पहाटेच्या काळोखात सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ५० फुट खोल नदीपात्रात कोसळून अपघात घडला.
या अपघटनंतर गोरे यांचे कार्यकर्ते तसेच संबंधितांनी रुग्णालय परीसरात गर्दी केली आहे. गोरे आपल्या मतदारसंघाकडे निघाले असताना त्यांच्या गाडीस हा अपघात घडला. उपलबद्ध माहितीनुसार, जयकुमार गोरेंसह इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. पण गंभीर दुखापत झाली आहे.