
no images were found
कमी खर्चात शेतीतून जास्त उत्पादन करणे हेच भविष्य काळातील शेतकऱ्यांचे सूत्र असणार – आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : मी लहानपणापासून शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार ऐकत आलो आहे. आज मात्र काही राजकीय लोक व पक्ष फुले आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याबाबत उलट सुलट बोलत आहेत. खऱ्या अर्थाने शाहू महाराज,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांनी कधीही जाती व्यवस्थेविरोधात बोलले नाहीत. मात्र आज काही राजकीय नेते व पक्ष या शाहू,फुले आणि आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा कट करत आहेत. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याबाबत विचार करण्याऐवजी या थोर विचारवंतांवर उलटसुलट बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकी हीच आपली खरी ताकद आहे. ही एकी जपा असे उदगार काँग्रेसचे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी सतेज कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी काढले.
येथील तपोवन मैदानावर या सतेज कृषी प्रदर्शनास आजपासून आमदार जिग्नेश मेवानी यांच्या हस्ते फीत कापून शानदार प्रारंभ झाला आहे.यावेळी झालेल्या उदघाटन कार्यक्रमात आमदार मेवानी यांनी आमदार सतेज पाटील यांना आपण भरवत असलेले शेतकऱ्यांसाठीचे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांनासाठीचे चांगले व्यासपीठ आहे. असाच उपक्रम मीही गुजरातमध्ये राबविणार असून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाची माहितीची देवाणघेवाण करून देऊया असे सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.
यावेळी सतेज कृषी प्रदर्शनात “जय जवान,जय किसन”चा नारा देत गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी एकी जपा महाराष्ट्राची एकी कोणी तोडू नाही शकणार असा संदेशही उपस्थित शेतकऱ्यांना दिला. शाहू महाराज यांचे विचार अतिशय प्रगतीशील होते आणि गुजरात मध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. शेतकरी आणि मजुरांच्या हातात सत्ता म्हणजे क्रांती परंतु आता उद्योगपतींच्या हातात सत्ता आहे. गुजरात येथील माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना देखील कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या पॅटर्न व तंत्रज्ञानाचा फायदा होईल आपल्या एकसंघतेला कोणी तोडता कामा नये तरच प्रगती होईल असे उद्गार काढले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये आमचे पॅनल आम्ही निवडून आणले आहे.दुधाची मागणी वाढली आहे.आम्ही शेतकऱ्यांना दूध दर वाढवून दिले आहेत.आम्ही शेतकऱ्यांना आतापर्यंत दूध दर वाढवून दिला आहे. शिवाय दूध पावडर मध्ये ही बारा टक्के फायदा झाला आहे त्यामुळेच आता शेतकऱ्यांनी व शेतकरी तरुणांनी म्हैशीच्या आणि गाईचे उत्पादन हाही जोडधंदा सुरू केला पाहिजे असे सांगितले.
यावेळी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात आमदार सतेज पाटील यांनी. भविष्यकाळातल्या काम करणाऱ्या शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान दाखविणे असे हे एक व्यासपीठ आपण या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केल्याचे सांगून, आम्ही या प्रदर्शनाच्या निमित्ताने काही नवीन तंत्रज्ञान नव्या संकल्पना म्हणजे हातकणंगल्यामध्ये अँकवा फोनिक शेती या पद्धतीचा एक नवीन तंत्रज्ञान आलेला आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना या ठिकाणी केला आहे. वर्टीकल फार्मिंग ची संकल्पना आता देशामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आणि या सगळ्या नव्या गोष्टी आपल्या तरुण शेतकऱ्यांच्या पुढं नव्या शेतकऱ्यांच्या पुढे जुन्या शेतकऱ्यांच्या पुढे जाव्यात हा उद्देश या प्रदर्शनाचा असल्याचे सांगितले.या प्रदर्शनातुन शेतकऱ्यांनी चांगले काहीतरी घेऊन जावे हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.
भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो व यातील महाराष्ट्र राज्य कृषी प्रधान म्हणून ओळखलं जातं आणि आपला कोल्हापूर जिल्हा देखील कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यामध्ये आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू आहेत. शंभर शंभर टन ऊस काढण्याची क्षमता असणारा शेतकरी या कोल्हापूर जिल्ह्याने त्या ठिकाणी पाहिले आणि म्हणून सामान्य माणूस या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे आहे त्या जमिनीतून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे करता येईल हेच भविष्यकाळातलं सूत्र असणार आहे आणि ते सूत्र या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळावं हा प्रामाणिक उद्देश आमचा निश्चितपणे असल्याचे सांगितले.
यावेळी सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर मा.आ. श्रीमती जयश्री जाधव, मा.आ. जयंत आसगावकर, मा. डॉ. संजय डी. पाटील, श्री. के. पी. पाटील, मा.श्री. बजरंग देसाई, मा. श्री. सुरेश साळोखे, मा. श्री. सत्यजित पाटील-सरुडकर, मा. श्री. संजय घाटगे, मा. श्री. राजीव आवळे, मा. श्री. विश्वास पाटील, मा. श्री. संजय पवार, मा. श्री. विजय देवणे, मा. श्री. मुरलीधर जाधव, मा. गुलाबराव घोरपडे, मा. व्ही बी पाटील, मा. श्री. कर्णसिंह गायकवाड, मा. श्री. सत्यजित जाधव,मा. श्री. अमरसिंह पाटील, मा. श्री. सुनिल शिंत्रे, मा. श्री. सचिन चव्हाण, मा. श्री. प्रताप उर्फ भैय्या माने,मा. श्री. तेजस सतेज पाटील,मा. शशांक बावचकर, मा. विनोद पाटील,मा. धीरज पाटील, गोकुळचे संचालक, माजी नगरसेवक, नगरसेविका, मा जि प, पं स सदस्य, शेतकरी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.