
no images were found
वीटभट्टीवर झालेल्या स्फोटात ७ ठार; १६ जखमी
पाटना : मोतिहारी (बिहार) येथील वीटभट्टीवर स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ७ जण मृत्युमुखी पडले असून जवळजवळ १५ ते १६ जण जखमी असल्याचे वृत्त आहे.
रामगढवा (नरिलगिरी) परिसरातील वीटभट्टीत स्फोट झाला असून या स्फोटात ७ जण मृत्युमुखी पडले असून जवळजवळ १५ ते १६ जण जखमी तर अजूनही काहीजण ढिगाऱ्याखाली सापडले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनास्थळी एसडीआरएफची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे तसेच पोलीसांकडून आवश्यक ती मदत पुरविली जात आहे.
स्फोटाचा मोठा आवाज दूरवर आल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करीत ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, “मोतिहारी येथील वीटभट्टीवर झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. पीएमएनआरएफ प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील.’