no images were found
ख्रिसमस, थर्टी फर्स्टला दारुची दुकानं पहाटे पाचपर्यंत सुरू
मुंबई : नवीन वर्ष आणि ख्रिसमस दोन्हीच्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होते. अशा तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही घोषणा केली आहे. या घोषणेनुसार २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. एरवी रात्री ११ वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी आहे.