
no images were found
तनिष्का तारळेकरची राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
आमशी : बोलोली (ता.करवीर) येथील श्री स्वयंभू हायस्कूलची विद्यार्थीनी तनिष्का उत्तम तारळेकर या विद्यार्थिनीची पनवेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रायफल नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने चिपळूण येथे झालेल्या विभागीय रायफल शुटींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर तिची पनवेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तनिष्का सध्या स्वयंभू हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.