
no images were found
475 ग्रामपंचायतीच्या सर्व मतदान केंद्रावर 18 डिसेंबर रोजी कलम 144 लागू
कोल्हापूर : जिल्ह्यातील एकूण 475 ग्रामंपचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी येणा-या उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित असण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या सर्व मतदान केंद्र परिसरामध्ये मतदाना दिवशी दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी खालील कृती करण्यास मनाई केली आहे.
1) मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बुथ स्थापीत करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरणे. 2) मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉडलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी बाळगणे, वापरणे अथवा मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. (निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून. 3) मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. 4) मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने कोणत्याही प्रकारची शस्त्रे (शस्त्र अधिनियम 1959 मध्ये नमुद केले प्रमाणे) बाळगण्यास. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी/कर्मचारी वगळून
आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग झाल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 18 ते 21 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.