
no images were found
स्वप्न आणि ध्येय यातील फरक समजावून घेऊन ध्येय निश्चिती केल्यास यशप्राप्ती निश्चित : प्रो.सर्जेराव राउत
कोल्हापूर : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सात्याने राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये विद्यार्थी तणावमुक्त अभ्यास व परीक्षेला सामोरा जाण्यासाठी विद्यार्थांचे मनोबल उंचावण्यासाठी आज जरगनगर येथे 10 च्या परीक्षेला तणावमुक्त करण्यासाठी या व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते चाटे स्कूलचे एकडमिक हेड प्रो.सर्जेराव राऊत यांचे स्वावत केले.
यानंतर आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्या जीवनातील प्रसंगाचे उदाहरण देताना ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, वडिलांच्या स्मृतीनिमित्य एका लहानशा खोलीमध्ये सुरु झालेले हे ग्रंथालय आज नावरूपाला येत आहे. त्यामुळे विद्यार्थांनीही जीवनात, स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि चिकाटी ठेऊन अभ्यास करून यश संपादन केले पाहिजे, विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षेला समोर जावे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन व्याख्यानात प्रो.सर्जेराव राऊत सर म्हणाले, स्वप्न आणि ध्येय यामधील फरक समजावून घेतल्यास ध्येय साध्य होईल त्यासाठी अशा परिक्षांमध्ये मेहनत म्हत्वाची आहे. अभ्यास करताना मनाची एकाग्रता महत्वाची असून विद्यार्थ्यांनी मार्कांच्या संकल्पना समजून घेल्या पाहिजेत. SQ3R (Survey, Question, Reading, Reminder,Writing) या थेरीपीचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांना याचा परीक्षेत फायदा होईल असे सांगत अनेक उदाहरणे देत विद्यार्त्याना प्रोत्साहित केले. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण त्यावेळी जी क्षमता वापरतो तशीच क्षमता मनापासून ध्येय निश्चिती करून या अभ्यासासाठी विद्यार्त्यानी लावाली पाहिजे.
आजच्या या व्याख्यानासाठी जरगनगर भागातील राजमाता जिजामाता गर्ल हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, साई इंग्लिश मेडियम स्कूलचे विद्यार्थी व शाळांचे शिक्षक उपस्थित होते. हा कायर्क्रम यशस्वी होण्यासाठी सचिन साळोखे, जयदीप मोरे, कृष्णा आतवाडकर, विजय आगरवाल, प्रीतम यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.