
no images were found
अल्पसंख्याक हक्क दिवस कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे – निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके
कोल्हापूर: अल्पसंख्याक विकास विभागाच्या परिपत्रकानुसार दि. 18 डिसेंबर 2022 हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.
कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांक संस्थेचे प्रतिनिधी व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांचे मनोगत तसेच जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन व अल्पसंख्यांक हक्क दिन योजना अंमलबजावणी सहभागाबाबत चर्चा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.