Home शासकीय आयुष्यमान भारत अंतर्गत पात्र 138 नागरीकांची ई-कार्डसाठी नोंदणी

आयुष्यमान भारत अंतर्गत पात्र 138 नागरीकांची ई-कार्डसाठी नोंदणी

1 min read
0
0
77

no images were found

आयुष्यमान भारत अंतर्गत पात्र 138 नागरीकांची ई-कार्डसाठी नोंदणी

कोल्हापूर : आयुष्यमान – प्रधानमंत्र जन आरोग्य योजने अंतर्गत व महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्य शहरातील पात्र 138 नागरीकांची ई-कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने आयुष्यमान – प्रधानमंत्र जन आरोग्य योजने अंतर्गत दिनांक 15 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून दि. 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात माहात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबरच एकत्र हि योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना विमा आणि हमी तत्वावर राबविण्यात येत असून या  एकत्रिक  योजनेअंतर्गत  समाविष्ठ असलेल्या कुटुंबापैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीनुसार करण्यात येत आहे.

यामध्ये लाभार्थीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डचे 1.50 लाख व आयुष्यमान प्रधानमंत्री  आरोग्य योजनेअंतर्गत्‍ 3.50 लाख असे 5 लाखाचा आरोग्य विमा मोफत मिळणार आहे.  यानुसार  शहरातील  सर्व  प्राथमिक  नागरी  आरोग्य  केंद्रावर  या कालावधीमध्ये विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रभाग निहाय नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करणेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड (कार्ड नसलेस योजनेत पात्र असलेचे पत्र किंवा तहशिलदारांचा दाखला) सोबत आणणे आवश्यक आहे. शिवाय आधार कार्डला मोबाईल  क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.यासाठी जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…