no images were found
पुणे ग्रोथ कॉरडॉर : पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि इनोव्हेशनचे नवे केंद्र
आगामी विमानतळ, एमआयडीसी आयटी पार्क आणि रिंग रोड प्रकल्पांसह पुरंदर करणार कनेक्टिव्हिटीची नवी व्याख्या, पुणे ग्रोथ कॉरिडॉरसाठी ठरणार उत्प्रेरक
पुणे:पुणे ग्रोथ कॉरिडॉर हा पायाभूत सुविधा, उद्योग आणि गुंतवणूक यांच्या एकत्रित विकासामुळे पश्चिम भारतातील सर्वाधिक आशादायी प्रगत पट्ट्यांपैकी एक म्हणून वेगाने प्रगती करत आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळ, एमआयडीसी आयटी पार्क आणि पुणे रिंग रोड या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून या कॉरिडॉरमुळे जाधववाडी, सासवड, जेजुरी, वडकी आणि हडपसर अॅनेक्स यांसारखी प्रमुख आर्थिक केंद्रांना परस्परांशी जोडली गेली आहेत. वाढलेली कनेक्टिव्हिटी, रोजगारातील संधी आणि रिअल इस्टेटची वाढती मागणी यामुळे हा कॉरिडॉर गुंतवणूकदार आणि गृहखरेदीदारांसाठी नजीकच्या भविष्यातील महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. पुढील काही वर्षांत हा कॉरिडॉर म्हणजे विस्तारीत पुण्याचा भाग असेलच, त्याचप्रमाणे नवकल्पना, आधुनिक सुविधा आणि उत्तम राहणीमान यांचा सांगड घालण्यात आलेला एक नवीन शहरी पट्टा तयार होणार आहे.
विकासाबाबत प्रतिक्रिया देताना शापूरजी पालनजी रिअल इस्टेटचे सीईओ श्री. सुमित सप्रू म्हणाले :”पायाभूत सुविधा हा कायमच आर्थिक प्रगतीचा पाया राहिला आहे. पुरंदर परिसरात विमानतळ, एमआयडीसी आयटी पार्क आणि रिंग रोड विकसित होत असल्याने पुणे ग्रोथ कॉरिडॉर वेगाने आकार घेत आहे. हा नोड पुणे आणि आसपासच्या शहरांसाठी कनेक्टिव्हिटी आणि संधींची नवी परिभाषा ठरू शकतो. या कॉरिडॉरमुळे जाधववाडी, हडपसर अॅनेक्स आणि जेजुरी हे भाग प्रचंड क्षमता असलेली गुंतवणूक केंद्रे होणार आहेत, जिथे सुधारित ॲक्सेसेबिलिटी आणि आर्थिक घडामोडींमुळे शहरी विकासाचा पुढील टप्पा आकारास येणार आहे.”