Home राजकीय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज: नाथा पाटील    

जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज: नाथा पाटील    

51 second read
0
0
32

no images were found

    जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज: नाथा पाटील                                                                   कोल्हापूर (प्रतिनिधी):आगामी होऊ घातलेला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून या तिन्ही मोर्चांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवावा असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले .

       युवा मोर्चा महिला मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या जिल्हा पदाधिकारी निवडीच्या प्रसंगी ते बोलत होते .यावेळी श्री नाथाजी पाटील पुढे म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या मोर्चा आघाडी यांचे पदाधिकारी म्हणजे पक्षाचे कान नाक आणि डोळे आहेत त्यामुळे पक्षाचा डोलारा या सर्व मोर्चा , आघाडी ,आणि प्रकोस्ठाच्या वरच अवलंबून असतो . त्यांनी केलेले काम हे पक्षाच्या मुख्य प्रवासासाठी अतिशय उपयोगी ठरते . त्यामुळे तुमच्या कामाचा वेगळा ठसा आपण उमटवावा, पार्टी त्याची निश्चितच दखल घेईल .

      यावेळी पक्षाच्या महिला मोर्चा ,युवा मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची पत्रे देण्यात आली .

        भारतीय जनता पार्टीचे नेते श्री शिवाजी बुवा यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी मोर्चा आणि प्रकोष्ठांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले .तर जिल्हा सरचिटणीस सुशीला पाटील यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी जागरण अभियान याविषयी मार्गदर्शन केले .

        यावेळी गडहिंग्लजच्या माजी सभापती जयश्री तेली , आजऱ्याच्या माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, कागलच्या माजी नगरसेविका सौ विजया निंबाळकर,जिल्हाचिटणीस धीरज करलकर, रेखा नांगरे पाटील,अर्जुन पाटील, रणजीत आडके, नितेश कोरी, सचिन देसाई,ऐश्वर्या पुजारी , सुजाता थडके, सुनीता घराळ,अर्चना रिंगणे, विमल अतिग्रे, संगीता मोरे , साधना माळी, क्रांती वाकुडे पदमजा पाटील, उज्वला पाटील, मेघा पाटील , राम तळेकर, अक्षय वरपे,आकाश पाटील, धनंजय पाटील, वृषभ कासार, करण यादव,पार्थ सावंत,ऐश्वर्या राऊत , संजय दासनहट्टी , यांचे सह आघाडी मोर्च्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

         या कार्यक्रम प्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मेघा राणी जाधव यांनी स्वागत केले,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवीश पाटील कौलकर यांनी प्रास्ताविक केले .तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार यांनी आभार मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…