Home शासकीय विविध क्रीडा स्पर्धेत यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजचे यश

विविध क्रीडा स्पर्धेत यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजचे यश

4 second read
0
0
57

no images were found

विविध क्रीडा स्पर्धेत यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजचे यश

कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठा अंतर्गत आंतर विभागीय जुदो स्पर्धा शिवाजी विद्यापीठ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये केएमसी कॉलेजच्या  अंकिता जाधव 57 किलो गटात द्वितीय क्रमांक,  ऋतुजा खाडे ७८ किलो वरील गटात द्वितीय क्रमांक,  रीना परीट ७८ किलो गटात तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. त्याचबरोबर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने शासकीय क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये  19 वर्षाखालील टेनीक्वाइट क्रीडा प्रकारात झाहेद जमादार, रितेश पाटील रोहित तोडकर व दीपक कागले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर 17 वर्षाखालील कुस्ती प्रकारात रोहित तोडकर व  तृप्ती देसाई यांनी आपापल्या वजनगटात प्रथम क्रमांक मिळवला. या सर्वांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून 19 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेमध्ये रोहन खाडे 70 किलो द्वितीय व मयूर कांबळे 74 किलो तृतीय क्रमांक मिळवला.  या सर्व खेळाडूंना कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण पौडमल, पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल नाईक, ग्रंथपाल प्रा.रविंद्र मांगले व डॉ. अमित रेडेकर यांचे प्रोत्साहन तर शारीरिक शिक्षक संचालक डॉ. राम पवार व क्रीडाशिक्षक संग्राम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…