
no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने शाश्वत गतिशीलतेसाठी वचनबद्धता केली अधिक दृढ
नवी दिल्ली, -२०४७ पर्यंत ऊर्जा स्वावलंबन आणि २०७० पर्यंत नेट झिरो म्हणजेच शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाशी आपली वचनबद्धता दृढ करत, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टिकेएम) ने आज इंडिया एनर्जी वीक २०२५ मध्ये भाग घेतला. हा कार्यक्रम ११ ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीत आयोजित केला जात आहे. इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) २०२५ हे स्वच्छ ऊर्जा उपाय सादर करण्यासाठी आणि ऊर्जा स्वावलंबन तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ऊर्जा परिस्थिती, तंत्रज्ञान, उद्योगातील ट्रेंड आणि धोरणात्मक दृष्टीकोनांवर चर्चा व्हावी म्हणून हा कार्यक्रम जागतिक राजकीय नेते, धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि अंतिम उपभोक्त्यांना एकत्र आणतो
टोयोटोनेने स्थानिक हरित ऊर्जेवर आधारित शाश्वत गतिशीलता उपायांवर भर देत अनेकांगी दृष्टिकोनावर आधारित विविध पर्यायी पॉवरट्रेन तंत्रज्ञान सादर केले. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विद्युतीकरण आणि पर्यायी इंधन यासारख्या अनेक हरित ऊर्जा मार्गांचा विचार केला जात आहे. भारताच्या ऊर्जा मिश्रण, ग्राहकांच्या विविध श्रेणी आणि त्यांच्या गरजा, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या सरकारच्या दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर, ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशासाठी उपयुक्त स्वच्छ तंत्रज्ञान विकसित करण्यावर टोयोटा भर देत आहे.
भारताच्या वेगवान अर्थव्यवस्था वाढीमुळे आणि नवीन वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे विद्युत वाहन आणि पर्यायी इंधनावर चालणारे स्वच्छ तंत्रज्ञान काळाची गरज बनले आहे.अशा परिस्थितीत इथेनॉल हे स्वदेशी, तत्काळ फायदा देणारे स्वच्छ आणि प्रभावी ऊर्जा स्त्रोत आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनाची गरज, ऊर्जा आयात खर्च आणि कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच, इथेनॉलच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते आणि ऊस व अन्नधान्याच्या अतिरिक्त उत्पादनातून सरकारलाही महसूल वाढविता येतो. याशिवाय, सरकारने पराली (शेती अवशेष) पासून इथेनॉल तयार करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे वातावरण प्रदूषण टाळता येईल आणि कचऱ्यापासून उपयुक्त पदार्थ निर्मिती शक्य होईल.
टोयोटो किर्लोस्कर मोटरचे भारतातील प्रमुख आणि कॉर्पोरेट अफेअर्स आणि गव्हर्नन्स विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की “इंडिया एनर्जी वीक हे ऊर्जा, गतिशीलता आणि तंत्रज्ञानआधारित कंपन्यांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ शाश्वत गतिशीलतेसह स्वच्छ इंधन पर्यायांवर जनजागृती करण्यास मदत करते.”
टोयोटाने इंडिया एनर्जी वीक २०२५ मध्ये सादर केलेली तंत्रज्ञाने:
• स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन (SHEV): इनोव्हा हायक्रॉस (SHEV), ज्यामध्ये उच्च कार्यक्षमतेचे हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टम आहे आणि E२० इंधनास अनुरूप आहे.
• फ्लेक्स-फ्युएल प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन (FFV-PHEV): प्रिउस (FFV-PHEV), ज्यामध्ये १००% इथेनॉल (जैवइंधन) वापरता येतो आणि सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होते.
• अर्बन बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) संकल्पना: पूर्णतः विद्युत वाहन, जे भविष्यातील संरचना आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते.
• फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहन (FCEV): मिराई (FCEV), जे भविष्यातील हायड्रोजन इंधनावर चालणारे वाहन आहे.
• इलेक्ट्रिक वेहिकल सब सिस्टीम: देशांतर्गत निर्मित ई-ड्राइव्ह प्रणाली, जी सर्व विद्युतीकरण झालेल्या वाहनांमध्ये वापरली जाते.