
no images were found
निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांसाठी 56 वी पेन्शन अदालत
कोल्हापूर, : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईव्दारा टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांसाठी 56 वी पेन्शन अदालत 5 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400001 येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार आहे.
पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी, एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी.च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारक आपल्या अर्जाच्या तिप्पट प्रति लेखा अधिकारी/ सचिव पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. भवन दुसरा मजला, मुंबई 400001 ला 14 फेब्रुवारी 2025 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुपाने (तक्रारींची मोठ्या प्रमाणात इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकतात. दिनांक 14 फेब्रुवारी नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.