
no images were found
बंद घरात शेंदूर फासलेल्या दगडांखाली नरबळी पुरला
औरंगाबाद : वाळूज येथे तीन महिन्यांपासून बंद असलेल्या या घराचं कुलूप फोडून पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरात दोन शेंदूर फासलेले दगड आढळून आले. त्या दगडांखाली मृतदेह एका चादरीत पुरण्यात आलेला होता. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून नुसता सांगाडा उरला होता. हा घातपाताचा प्रकार आहे, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. तसंच नरबळीचा संशही व्यक्त करण्यात आला आहे.
वाळूज येथील समता कॉलनीमध्ये सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचं घर आहे. शेळके यांचं दुमजली घर तीन महिन्यांपासून बंद होतं. ७ महिन्यांपूर्वी या घराचा तळमजला भाडे तत्त्वावर एका कुटुंबाला देण्यात आला होता. या कुटुंबाने भाडे थकवल्यामुळे शेळके त्यांना सातत्यानं फोन करत होते. पण फोन उचलला जात नसल्यानं अखेर शेळके यांना थेट घर गाठलं. फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथील काकासाहेब भुईगड यांनी हे शेळके यांच्या घरात भाड्याने राहायला होते. ते आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह या घरात राहत होते. नवरात्रीत भुईगड हे आपल्या गावी जाणार असल्याचं सांगून गेले. लवकरच भाडं देऊन असं सांगून गेले. पण नंतर त्यांचा फोन बंद येत असल्यानं शेळके एक दिवस घरी धडकले.
घरी आले असता कुलूप पाहून शेळके यांना शंका आली. त्यांना 3 महिन्यांपासून घर बंद असल्याचं कळलं. जेव्हा घराचं कुलूप फोडून त्यांनी आत पाहिलं तेव्हा ते हादरले. घरातील साहित्य गायब होतं. स्वयंपाक घरातील ओट्याखाली खोदकाम करण्यात आलं होतं. सिमेंट वाळूने ते बंद करण्यात आलं होतं. तसंच त्यावर शेंदूर फासलेले दोन दगड, लिंबू आढळून आले होते. हे काम जेव्हा उकरुन काढण्यात आल, तेव्हा एक कुजलेला मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवल्याचं आढळून आलं.