Home सामाजिक ‘स्कील’ सर्वच घटकांसाठी मार्गदर्शक ठरेल: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

‘स्कील’ सर्वच घटकांसाठी मार्गदर्शक ठरेल: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

4 second read
0
0
43

no images were found

‘स्कील’ सर्वच घटकांसाठी मार्गदर्शक ठरेल: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर : कौशल्य निर्मिती आणि विकास या क्षेत्रांमध्ये डॉ. आण्णासाहेब गुरव प्रभावी कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेले ‘स्कील’ पुस्तक निश्चितपणाने सर्वच घटकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक आणि कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. आण्णासाहेब गुरव आणि प्राचार्य डॉ. आर.एस. साळुंखे यांनी लिहीलेल्या ‘स्कील’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते काल (दि. १२) सायंकाळी व्यवस्थापन परिषद सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थी व शिक्षककेंद्री उपक्रम सातत्याने राबविण्यात डॉ. गुरव अग्रस्थानी असतात. त्याचबरोबर विविध कौशल्य विकासाचे उपक्रम राबवून त्यांचा जनसामान्यांपर्यंत प्रसार करण्यासाठीही ते प्रयत्नशील असतात, ही बाब अत्यंत कौतुकास्पद स्वरुपाची आहे. कोरोना काळात त्यांनी ऑनलाईन राबविलेले उपक्रम महत्त्वाचे ठरलेच, शिवाय, व्यवस्थेबाहेरीलही व्यक्तींनाही त्यांचे लाभत असलेले मार्गदर्शन उपयुक्त आणि विद्यापीठाला जनतेशी जोडणारे ठरते. त्यांचे गूळ आणि त्याचे उपपदार्थ यांविषयीचे संशोधनही चर्चेत राहिले. नवनवीन कौशल्ये सातत्याने विद्यार्थ्यांना, नागरिकांना प्रदान करीत राहणे, हा त्यांचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. त्यांनी कौशल्याच्या अनुषंगाने इंग्रजीतून निर्माण केलेले पुस्तक महत्त्वाचे आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे लाभ पोहोचविण्यासाठी त्यांनी त्याचा मराठीतून अनुवाद करावा, त्याचप्रमाणे त्याची कार्यपुस्तिकाही तयार करावी, अशी सूचना कुलगुरूंनी केली.

यावेळी कौशल्य व उद्योजकता केंद्राच्या वार्षिक अहवालांचेही कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, शिवाजी युनिव्हर्सिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.डी. राऊत, डॉ. केदार मारुलकर आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…