no images were found
महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली
मुंबई : लव्ह जिहादविरोधात कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरु असून येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात लव्ह जिहादची प्रकरण वाढत असल्याने लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला ३ ते ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो असंही कायद्यात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा आहे. लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला ३ ते ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो असंही कायद्यात आहे. यातली पीडित मुलगी १८ वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.
सध्या देशात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा संबंध लव्ह जिहादशी जोडला जात असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे. श्रद्धा वालकर हिची हत्या लिव्ह इन रिलेशनमध्ये रहाणाऱ्या आफताब पुनावालाने केली होती.