no images were found
कॉर्निंग गोरील्ला ग्लास व्हिक्टस २ च्या स्वरुपात
कॉर्निंग गोरील्ला ग्लास ने व्हिक्टस २ च्या स्वरुपात नवीन ग्लास इनोव्हेशनचे अनावरण
गोवा : कॉर्निंग इनकॉर्पोरेटेडने आज कॉर्निंग गोरील्ला ग्लास व्हिक्टस २ च्या स्वरुपात त्यांच्या नवीन ग्लास इनोव्हेशनचे अनावरण केले. कॉर्निंगने त्यांच्या कॉर्निंग गोरील्ला ग्लास पोर्टफोलिओचा विस्तार करून काचेच्या सीमांना अधिक व्यापक करण्याचे कार्य कायम ठेवले आहे. नव्या काचेची डिझाईन असलेले गोरील्ला ग्लास व्हिक्टस २ जगातील सर्वात कठीण वस्तूंमध्ये समावेश होणाऱ्या कॉंक्रिटसारख्या कठीण व खडबडीत पृष्ठभागावर आदळल्यानंतरही सुधारित कामगिरी (ड्रॉप परफॉर्मन्स) प्रदान करते, तसेच ते गोरिला ग्लास व्हिक्टसचे स्क्रॅच पडण्यापासूनही बचाव करते.
कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे व्हाइस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर डेव्हिड वेलस्क्वेझ म्हणाले. स्मार्टफोन्स हे आपल्या डिजिटल जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत आणि विशिष्ट स्क्रॅच व ड्रॉप रेझिस्टन्सची आवश्यकता ही केवळ आपल्या स्पष्ट, नुकसान-मुक्त डिस्प्लेवरील वाढत्या अवलंबित्वामुळे वाढली आहे, यामध्ये पृष्ठभाग महत्त्वाचे आहेत आणि काँक्रीटसारखे खडबडीत पृष्ठभाग सर्वत्र उपलब्ध आहेत. कॉर्निंगच्या विस्तृत संशोधनातून असे दिसून आले आहे, की चीन, भारत आणि युनायटेड स्टेट्स या तीन मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठांमधील ८४ टक्के ग्राहकांनी एखाद्या ब्रँडची खरेदी करण्यामागे ते सर्वप्रथम त्याच्या टिकाऊपणाचा विचार करत असल्याचे म्हटले आहे.
वेलास्क्वेझ पुढे म्हणाले की अधिक अत्याधुनिक आणि वैविध्यपूर्ण डिझाईन्समुळे आजचे स्माटफोन चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत जवळपास १५ टक्के जास्त वजनदार झाले आहेत आणि स्क्रीनचा आकार १० टक्के मोठा झाला आहे. यामुळे कव्हर ग्लासवर पडणारा ताण आणि नुकसान होण्याची शक्यता यांमध्ये वाढ होते. गोरील्ला ग्लास व्हिक्टस २ हे ग्राहक आणि मूळ साधनसामग्री निर्माते (ओईएम) या दोघांसाठीही कठीण्यतेच्या व्याख्येला नव्याने परिभाषित करते.
गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ चे सध्या अनेक ग्राहकांकडून मूल्यांकन केले जात आहे आणि पुढील काही महिन्यांतच ते बाजारात उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. गोरिल्ला ग्लास ४५ हून अधिक प्रमुख ब्रँड्सद्वारे ८ अब्जाहून अधिक उपकरणांमध्ये डिझाइन केले गेले आहे. कॉर्निंगने तिच्या संपूर्ण मोबाईल कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स (एमसीई) मार्केट ऍक्सेस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कार्यप्रदर्शन वाढवणाऱ्या, नवीन कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये प्रदान करणाऱ्या, नवीन डिझाइनला सक्षम व समर्थन करणाऱ्या तसेच वापरकर्त्याला वर्धित वास्तविकता व थ्री-डी सेन्सिंगसह सखोल अनुभव प्रदान करणाऱ्या तिच्या बाजारातील आघाडीच्या कव्हर ग्लासेस तसेच सेमीकंडक्टर उत्पादनांसाठी काच आणि ऑप्टिक्ससह कंपनीचा नावीन्यपूर्णतेचा वारसा चालू ठेवला आहे.