डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार कसबा बावडा – ( प्रतिनिधी )डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. २००० कोटींच्यावर उलाढाल असलेला बीव्हीजी उद्योग समुह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या समुहात सध्या ७०,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. …