Home औद्योगिक वेदांता रिसोर्सेसच्या अनिल अगरवाल यांनी रोखेधारकांना परतफेड करण्याची प्रक्रिया केली पूर्ण

वेदांता रिसोर्सेसच्या अनिल अगरवाल यांनी रोखेधारकांना परतफेड करण्याची प्रक्रिया केली पूर्ण

11 second read
0
0
18

no images were found

वेदांता रिसोर्सेसच्या अनिल अगरवाल यांनी रोखेधारकांना परतफेड करण्याची प्रक्रिया केली पूर्ण

कोल्हापूर ,  : धातू आणि खाणकाम उद्योगक्षेत्रातील दिग्गज वेदांता रिसोर्सेस लिमिटेडने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या रोखेधारकांना ७७९ मिलियन यूएस डॉलर्सचे अपफ्रंट पेमेंट केले आहे आणि कर्ज पुनर्गठनाचा एक भाग म्हणून परतफेड करणे पूर्ण केले आहे.

    रोखेधारकांना बुधवारी अपफ्रंट पेमेंट करण्यात आल्याचे वेदांता रिसोर्सेस लिमिटेडने एका वृत्तामध्ये नमूद केले आहे. वृत्तामध्ये म्हटले आहे की, ३.२ बिलियन डॉलर्सच्या रोख्यांची परिपक्वता ज्यामध्ये २०२९ पर्यंत यशस्वीपणे वाढवण्यात आली होती, अशा यावर्षीच्या सुरुवातीला मिळालेल्या संमतीनुसार रोखेधारकांना परतफेड करणे व्हीआरएलने ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण केले आहे.

    रोख्यांचा एक भाग रिडीम करून त्यांच्या परिपक्वता पुढे वाढवण्यासाठी वेदांता रिसोर्सेसने रोखेधारकांना ७७९ मिलियन यूएस डॉलर्सचे अपफ्रंट रोख पेमेंट यशस्वीपणे केले आहे. त्यांनी रोखेधारकांना ६८ मिलियन यूएस डॉलर्सची कन्सेन्ट फी देखील दिली आहे, कंपनीने आधी जाहीर केलेल्या पुनर्गठनाला ज्यांनी मान्यता दिली अशा रोखेधारकांना ही फी देण्यात आली आहे.

     जानेवारी महिन्यात वेदांताला त्यांचे प्रचंड मोठे कर्ज ओझे हलके करण्यासाठी रोखेधारकांकडून रोख्यांच्या चार सीरिजचे पुनर्गठन करण्यासाठी संमती मिळाली. यामध्ये दोन प्रत्येकी १ बिलियन यूएस डॉलर्सचे रोखे होते, ज्यांची परिपक्वता २०२४ मध्ये होती, एक रोखा १.२ बिलियन यूएस डॉलर्सचा होता, परिपक्वता २०२५ मध्ये होती आणि एक रोखा ६०० मिलियन यूएस डॉलर्सचा होता, याची परिपक्वता २०२६ मध्ये होती.

     डिसेंबर महिन्यात व्हीआरएलने २०२४ आणि २०२५ मध्ये परिपक्व होत असलेल्या ३.२ बिलियन यूएस डॉलर्सच्या कर्जाची परतफेड कर्णयसाठी खाजगी क्रेडिट कर्जदात्यांकडून १.२५ बिलियन यूएस डॉलर्सचे कर्ज घेतले. वेदांता ग्रुपने गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात महत्त्वपूर्ण डीमर्जर आणि रिऑर्गनायझेशनची घोषणा केली. वृत्तामध्ये नमूद केल्यानुसार यामुळे वेदांता समूहातील १७ प्रमुख व्यवसायांची पुनर्रचना केली जाईल.

     वृत्तामध्ये म्हटले आहे की, “प्रत्येक व्यवसायामध्ये जागतिक स्तरावरील व्यवस्थापन नेतृत्व आहे, सर्वात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानांना उपयोगात आणले जाते आणि इम्पोर्ट सब्स्टिट्यूशन आणि देशांतर्गत मागणी पूर्ण करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. हे व्यवसाय इन्स्टिट्यूशनल आणि रिटेल गुंतवणूकदारांना एकसमान, उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण गुंतवणूक संधी देतात.”

     झिंक, चांदी, लीड, ऍल्युमिनियम, क्रोमियम, तांबे, निकेल या धातू व खनिजांसह; तेल व वायू यांच्यासह भारतीय आणि जागतिक कंपन्यांमध्ये संपत्तींचा अनोखा पोर्टफोलिओ वेदांताने निर्माण केला आहे, यामध्ये आयरन ओर आणि स्टील, कोळसा व नूतनीकरणीय उर्जेसह वीज यांचा यामध्ये समावेश आहे. आता ही कंपनी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादनात पदार्पण करत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…